आमचे बहु-विद्याशाखीय मंडळ: खऱ्या आयुष्यासाठी संपूर्ण काळजी

संपूर्ण आरोग्यासाठी बहु-विद्याशाखीय (multi-disciplinary) दृष्टिकोनाची आवश्यकता असते. एखाद्या क्लिनिकल वातावरणात, कर्करोगाच्या रुग्णाला जितकी गरज एका ऑन्कोलॉजिस्टची (कर्करोग तज्ज्ञ) असते, तितकीच गरज एका न्यूट्रिशनिस्टची (पोषणतज्ज्ञ) देखील असते. खऱ्या आयुष्यात, रुग्णांना अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते ज्यावर केवळ औषधे उपचार करू शकत नाहीत — जसे की आर्थिक ताण (financial toxicity), भावनिक थकवा आणि लॉजिस्टिक सपोर्टची गरज.

आमचे मंडळ या “ग्राउंड झिरो” (वास्तविक) परिस्थितीचे प्रतिबिंब आहे. आमच्याकडे केवळ अत्यंत नामांकित वैद्यकीय तज्ञच नाहीत, तर समाजाच्या गरजा समजून घेणारे “प्रॉब्लेम सॉल्व्हर्स” (समस्या निवारक) देखील आहेत.

आमच्या मंडळाची ओळख

डॉ. वसीम फोपळणकर

डॉ. वसीम एस. फोपलुनकर हे एक नामवंत कर्करोगतज्ज्ञ असून रेडिएशन ऑन्कोलॉजीमधील त्यांच्या नैपुण्यामुळे अवघड आणि गंभीर आजारांवरील उपचारांसाठी त्यांची विशेष ओळख आहे. त्यांनी टाटा मेमोरियल (मुंबई), कॅनडा आणि सौदी अरेबिया येथे काम केले आहे. त्यांनी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

वैद्यकीय विशेष नैपुण्य
- IMRT
- IGRT
- रॅपिड आर्क (Rapid Arc)
- स्टिरिओटॅक्टिक

(OPD) वेळा
मंगळवार, बुधवार, शुक्रवार सकाळी १० ते सायंकाळी ५ गुरुवार सकाळी १० ते दुपारी १

शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण
- MBBS आणि MD (रेडिओथेरपी) डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज (१९९९) आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई (२००४)
- IMRT हेड अँड नेक कंटूरिंग प्रिन्सेस मार्गारेट हॉस्पिटल, टोरांटो, उत्तर अमेरिका (२००८)
- प्रगत तंत्रज्ञान प्रशिक्षण एक्लिप्स प्लॅनिंग (झुग, स्वित्झर्लंड) आणि रॅपिड आर्क (कोपनहेगन, डेन्मार्क)

सदस्यत्व आणि कामगिरी
- असोसिएशन ऑफ रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट ऑफ इंडियाचे ~आजीव सदस्य
- असोसिएशन ऑफ हायपरथर्मिया इन ऑन्कोलॉजीचे ~आजीव सदस्य
- कॅनेडियन असोसिएशन ऑफ रेडिएशन ऑन्कोलॉजिस्टचे ~आजीव सदस्य
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये अनेक वैज्ञानिक लेख प्रकाशित

डॉ. संदीप एम. बिप्टे

कन्सल्टंट ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जन (स्तन कर्करोग व पुनर्रचना शस्त्रक्रिया तज्ज्ञ)

डॉ. पवन अग्रवाल एक्सलन्स अवॉर्ड २०२१

सध्या कार्यरत (संलग्न रुग्णालये)
- अपोलो कॅन्सर सेंटर, नवी मुंबई
- बॉम्बे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
- पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल
- जसलोक हॉस्पिटल
- रहेजा फोर्टिस हॉस्पिटल
- ब्रीच कँडी हॉस्पिटल

- आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण (UK)

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण (UK)
- रॉयल मार्सडेन हॉस्पिटल, लंडन: ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट फेलोशिप.
- UCL & रॉयल फ्री NHS ट्रस्ट, लंडन: इंट्राऑपरेटिव्ह रेडिओथेरपी प्रशिक्षण.
- गाइज अँड सेंट थॉमस NHS ट्रस्ट: क्लिनिकल व्हिजिटिंग फेलो.

राष्ट्रीय प्रशिक्षण (भारत)
टाटा मेमोरियल सेंटर (TMH), मुंबई: स्तन विकारांमधील फेलोशिप व विशेष प्रशिक्षण.

संशोधन (Research)
- 'M1-RCT' आणि इंट्राम्युरल ट्रायल (TMH, मुंबई) मध्ये सक्रिय सहभाग.
- 'TARGIT E' ट्रायल प्रोटोकॉल (UCL, लंडन) मध्ये सहभाग.

तज्ज्ञ मार्गदर्शक आणि सामाजिक योगदान
MASICON & MSS: थेट शस्त्रक्रिया प्रात्यक्षिक (Live Surgery Demonstration) आणि व्याख्यान.

निमंत्रक (Convenor): आंतरराष्ट्रीय वेबिनार आणि कार्यशाळा आयोजन.

जनजागृती: FDCWC - राष्ट्रीय स्तन कर्करोग जनजागृती उपक्रम.

प्रकाशने: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये (Index Journals) शोधनिबंध.

शकूर तिसेकर

समाजसेवक | लेखक | सामाजिक नेते
एक अत्यंत समर्पित समाजसेवक आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून शकूर तिसेकर ओळखले जातात. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही देशांमध्ये आपला वारसा आणि समाजाच्या आधुनिक गरजा यांच्यातील महत्त्वाचा दुवा साधण्याचे काम ते करत आहेत. त्यांचे हे कार्य प्रशासन, संस्कृती संवर्धन आणि आरोग्य क्षेत्रातील जनजागृती अशा विविध स्तरांवर विस्तारलेले आहे.

सामाजिक नेतृत्व आणि प्रशासन (Civic Leadership & Governance)
स्थानिक प्रशासनाचे सल्लागार:मेलबर्न येथील विंडहॅम कौन्सिलच्या (Wyndham Council) महापौरांनी त्यांची 'पीपल्स ॲडव्हायझरी कमिटी'वर (People Advisory Committee) सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या लोकांसाठी हा एक अत्यंत अभिमानाचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन: समाजावर येणाऱ्या कठीण प्रसंगात मदत करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. 'कोकण डिझास्टर मॅनेजमेंट' (Kokan Disaster Management) सारख्या उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे.

संस्कृती संवर्धन आणि प्रसारमाध्यमे (Cultural Preservation & Media)
डिजिटल क्षेत्रातील योगदान:कोकण विभागातील पर्यटन, व्यवसायाच्या संधी आणि कोकणाविषयी दर्जेदार माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हनीफ मोडक यांच्या सोबतीने'KokanPulse.com'या डिजिटल प्लॅटफॉर्मची सह-स्थापना केली.
साहित्यिक योगदान:ज्ञान वाटपाच्या उद्देशाने त्यांनी आजवर तीन पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या'द डाएट मिस्ट्रीज' (The Diet Mysteries)या पुस्तकाची दखल अनेक राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी घेतली असून, 'लिटररी पायोनिअर्सकडून या पुस्तकाला २०२३ चा प्रतिष्ठित'हॉल ऑफ फेम' (Hall of Fame)पुरस्कार मिळाला आहे.
सांस्कृतिक दस्ताऐवजीकरण:कोकणी मुस्लिम समाजाची संस्कृती जतन करण्यासाठी त्यांनी एका महत्त्वाच्या ई-बुक (e-book) प्रकल्पाचे नेतृत्व केले. यामध्ये लग्नसमारंभ, वारसा जपणारे सण-उत्सव, खाद्यसंस्कृती, पारंपरिक कोकणी गीते आणि शायरी यांसारख्या विषयांचे सविस्तर दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.

आरोग्य जनजागृती आणि शिक्षण (Health Advocacy & Education)
स्तनांच्या कर्करोगाविषयी जनजागृती: डॉ. वसीम फोपळूणकर यांच्या सोबत ते समाजात स्तानांच्या कर्करोगाबाबत (Breast Cancer) जनजागृती करण्यासाठी आणि याविषयीचे शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
मातृभाषेतून आरोग्य शिक्षण: कर्करोगासारख्या गंभीर विषयाची माहिती आपल्या लोकांना त्यांच्याच भाषेत मिळावी, यासाठी त्यांनीfoundations2health.comया वेबसाइटसाठी मराठी भाषेत मजकूर उपलब्ध करून दिला आहे.
आरोग्य विषयक स्तंभलेखन: 'रायगडचा आवाज' या वृत्तपत्रात ते साप्ताहिक स्तंभलेखक म्हणून काम पाहतात. याद्वारे ते आहार आणि पोषणाविषयी मोलाचे मार्गदर्शन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात.
अनुवाद आणि सुलभता:आरोग्य शिक्षण हे ज्याच्या त्याच्या मातृभाषेत असावे या विचाराने, ते सध्या 'स्तनाचाकर्करोग: तुमचेप्रश्न, आमचीउत्तरे' या पुस्तकाचे मराठी आणि उर्दूभाषेत भाषांतर करण्याचे काम करत आहेत.

हनीफ मोडक

अत्यंत अनुभवी समाजसेवक आणि भरवश्याचे नेतृत्व

मानवतावादी
रणनीतीकार

जनसंपर्काचा आणि कार्याचा वारसा हनीफ मोडक हे त्यांच्या प्रामाणिकपणा, विचारांमधील स्पष्टता आणि अडचणीच्या काळात हमखास मार्ग काढणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. तळागाळापासून ते संस्थात्मक पातळीवर त्यांनी कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वात समजूतदारपणा, संयम आणि शांत पण ठाम निग्रह दिसून येतो, ज्यामुळे समाजात त्यांना मोठा मान आहे.

एक असाधारण मानवतावादी कार्य
आखाती युद्धाच्या (Gulf War) कठीण काळात, परिस्थिती अत्यंत बिकट असताना, हनीफभाई आणि त्यांच्या वडिलांनी जीवाची पर्वा न करता एक धाडसी मोहीम राबवली.
"७२० लोकांची सुखरूप सुटका केली."
या अतुलनीय कार्यासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

कार्यक्षेत्रे
हनीफभाईंचे कार्य केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित नाही. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते चार मुख्य स्तंभांवर भर देतात:
- शिक्षण: पायाभूत सुविधा आणि मदत.
- रोजगार: संधींची निर्मिती.
- सामाजिक सलोखा: समाजाला जोडण्याचे काम.
- विकास: समाजाची प्रगती.